सुरुवात
नव्या दशकाची सुरुवात घेवुन आली ही सकाळ...
धुक्यातला सूर्य पाहताना मन ही झाले घायाळ..
आताच या नव वर्षी विचार आला नवा..
ही कविता लिहिन्यासाठी आशीर्वाद तुमचा हवा..
कधी नव्हे तो एवढा विचार करू लागलो..
कवितेतून मनात आयुष्य बोलू लागलो..
आधी कधी अस झाले नहीं आजच का होतय?
आयुष्यात पहिल्यांदा विचार करावासा वाटतोय
मित्रांनो ,हे शब्द नाहीत कुनावरच्या प्रेमाचे..
हे शब्द आहेत आयुश्यवारिल मोहाचे..
सुंदर आयुष्याची रांगोळी माझ्या मनाने रेखाटली..
हाच नवा कल्पक विचार,मनात कविता साकारली...
दशकाचा हा सूर्य , मला मोठे करून गेला..
आतल्या आत मला स्वताला जिंकवुन गेला..
-प्रताप
वेळ
अशीच यावी वेळ एकदा.....आली ती वेळ..
वेळ नव्या दिशांची,नव्या विचारांची..
नव्या कल्पनांची,नव्या भावनांची..
आली ती वेळ..
वेळ नव्या क्षणांची,नव्या गुणांची..
नव्या गंधांची,नव्या रंगांची..
आली ती वेळ..
वेळ नव्या वादाची,नव्या नादाची..
नव्या मनाची,नव्या विश्वासाची..
आली ती वेळ..
वेळ नव्या सुखाची,नव्या संकटांची..
नव्या दुखाची,नव्या मोहाची..
आली ती वेळ..
वेळ नव्या नात्याची,नव्या मैत्रीची..
नव्या आपुलकीची,नव्या स्नेहाची..
आली ती वेळ..
वेळ नव्या बंधनांची,नव्या स्वातंत्र्याची..
नव्या शब्दांची,नव्या प्रेमाची..
-प्रताप.

No comments:
Post a Comment